पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात आयटी कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

मृत सचिन वांडेकर

आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका युवकाने पिस्तुलातून स्वतःच्या छातीवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सांयकाळी पिंपरीमध्ये (पुणे) घडली. सचिन वांडेकर (वय. २८, रा. पिंपळे गुरव, मूळ आष्टी, जिल्हा बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

आई-बाबांमधील भांडणाने त्रस्त मुलाचे राष्ट्रपतींना पत्र

मृत सचिन हा विमान नगर येथील एका आयटी कंपनीत कामाला होता. त्याने तीन दिवसांपूर्वी तिथले काम सोडल्याचे सांगण्यात येते. सचिन हा आपला लहान भाऊ दीपक आणि मित्र विशाल अशोक लहाने याच्यासह पिंपळे गुरव येथे राहत होता. काम सोडल्यामुळे तो तीन दिवसांपासून रुमवरच होता. रविवारी सांयकाळी विशाल बाथरुममधून तर दीपक बाहेरुन आला त्यावेळी सचिन हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सचिनच्या आत्महत्ये मागचे कारण समजलेले नाही. पण त्याच्याकडे पिस्तुल कोठून आली, हा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

बीडमध्ये दोन दिवसात ४ शेतकऱ्यांची आत्महत्या