पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात मुंबईनंतर पुणे दुसऱ्या क्रमांकाचं कोरोनाचं हॉटस्पॉट

कोरोना विषाणू (संग्रहित छायाचित्र)

मुंबईनंतर पुणे शहर राज्यात कोरोनाचं दुसऱ्या क्रमांकाचं हॉटस्पॉट ठरत चाललं आहे. राज्यात कोरोनाचा आकडा ६०० पार आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईत आतापर्यंत ३३० रुग्ण आढळले असून केवळ मुंबईत आतापर्यंत २२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर  पुण्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही ६१वर पोहोचली आहे.

मोरांना पाहण्यासाठी मुंबईकरांकडून लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन

राज्यात  पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण हा पुण्यात आढळला होता. पहिल्यांदा ९ मार्चला पुण्यात कोरोनाचा रुग्ण आढळला होता. दुबईवरुन परतलेलं हे जोडपं होतं. या जोडप्याला आणि त्यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती.  हे जोडपं आता पूर्णपणे  बरं झालं आहे.

कोविड-१९ : एकट्या मुंबईत एका दिवसांत ५२ रुग्ण, चार जणांनी गमावला जीव

पुण्यात सिंहगडरोड, आंबेगाव, कोंढावा या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. पुण्यात कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही रुग्णांचं वय हे ५० हून अधिक होतं तसंच आरोग्याच्या अनेक समस्यांनी ते ग्रासले होते.