पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची लोकसभेवर निवड झाल्यामुळे ते पद रिक्त झाले होते. आता पुण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचवेळी जळगावचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे सर्व केले असले, तरी येत्या काही दिवसांत आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करीत आहोत, हेसुद्धा मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

गिरीश बापट यांनी गेल्याच आठवड्यात आपल्या मंत्रिपदाचा आणि विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडील खाती आता कोणाला मिळणार यावरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. गिरीश बापट यांच्याकडील विधीमंडळ कामकाज खाते विनोद तावडे यांच्याकडे, तर अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कार्यभार जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

खरीप आढावा बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेच्या शेवटी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.