पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा २०० टक्के विक्रमी पावसाची नोंद

पुणे जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद

पुण्यात यंदा मागील पाच वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा २०० टक्के इतक्या प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आहे.  हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

भास्कर जाधवही शिवसेनेत, शुक्रवारी औपचारिक प्रवेश

यापूर्वी २०१५ च्या ऑगस्टच्या अखेरपर्यंत पुणे जिल्ह्यात ४२५.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. जी सरासरी पावसापेक्षा खूप कमी होती. २०१६ मध्ये ९४१.२ मिमी, २०१७ मध्ये पावसाने १,००० चा पल्ला पार करत १,०९१,८ मिमी मिमी पावसाची नोंद झाली होती. तर मागील वर्षी  म्हणजे २०१८ च्या ऑगस्ट अखेरीस पुणे जिल्ह्यात ९४१.१ मिमी इतका पाऊस पडला होता.

विक्रम लँडर सापडला पण झुकलेल्या अवस्थेत...

यंदाच्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात १,५६३.७ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून सरासरी पावसाच्या तुलनेत हा आकडा २०० टक्क्यांनी वाढ दर्शवणार आहे.