पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रुग्णाच्या मृत्यूच्या आरोपावरून पुण्यात डॉक्टरवर गुन्हा

संग्रहित छायाचित्र

एका २५ वर्षीय तरुणाच्या मृत्यूला जबाबदार असल्याच्या आरोपावरून पुण्यातील एका महिला डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. पुष्पा निरंजन जोशी (वय ६८) असे या डॉक्टरचे नाव आहे. खडकी पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीतील रेंजहिल्स भागात गेल्या दहा वर्षांपासून डॉ. जोशी दवाखाना चालवतात. ५ ऑक्टोबर २०१८ रोजी आशिष आल्हाट नावाचा एक रुग्ण त्यांच्या दवाखान्यात आला होता. छातीत दुखत असल्याचे त्याने यावेळी डॉक्टरांना सांगितले. डॉ. जोशी यांनी तपासल्यानंतर लगेचच त्याला एक इंजेक्शन दिले. या इंजेक्शनच्या दुष्परिणामामुळे आशिष आल्हाट याला जास्तच त्रास होऊ लागला. पण याकडे डॉ. जोशी यांनी दुर्लक्ष केले. त्यावर तातडीने पुढील उपचार न केल्याने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप त्याची आई मीना आल्हाट यांनी केला आहे.

ससून रुग्णालयातून आशिष आल्हाट याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यावर या प्रकरणी भारतीय दंडविधान संहितेतील ३०४ (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक छाया कांबळे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.