पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यामध्ये यंदाही अकरावीच्या ३०००० जागा रिक्त राहण्याचा अंदाज

अकरावी प्रवेश प्रक्रिया

अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना आता शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे विभागात ३०००० जागा रिक्त राहणार आहेत. सध्या केंद्रीय प्रवेश पद्धतीमध्ये विशेष फेरीद्वारे प्रवेश दिले जात आहेत. पुणे विभागात अकरावीच्या १,०४,१३९ जागा होत्या. विशेष फेरीतील प्रवेश निश्चित झाल्यानंतर ५२५३३ जागा रिक्त राहतील, असा अंदाज आहे. 

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी बिग बी करणार मदत

पुणे विभागातील केंद्रीय प्रवेश पद्धतीच्या प्रमुख आणि शिक्षण विभागाच्या उपसंचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, विशेष फेरीची गुणवत्ता यादी १४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल. या फेरीनंतर केंद्रीय प्रवेश समितीकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने २० ते २७ ऑगस्ट या काळात प्रवेश दिले जातील. अनेक विद्यार्थी या पद्धतीने प्रवेश घेण्याची वाट बघत असतात. त्यामुळे या पद्धतीने आणखी २०००० प्रवेश होतील. त्यामुळे या फेरीनंतर सुमारे ३०००० जागा रिक्त राहतील.

मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ज्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश पद्धतीच्या माध्यमातून प्रवेशासाठी प्रयत्न केलेले नाहीत. ते प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेश घेऊ शकतात. प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या जागांनुसार या प्रवेश प्रक्रियेत प्रवेश दिले जातात. यानंतर २७ ऑगस्ट रोजी पुणे विभागात अकरावीच्या एकूण किती जागा यंदा रिक्त राहिल्या आहेत, हे आम्ही जाहीर करू.

आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य पी बी बुचडे म्हणाले, अनेक विद्यार्थी पहिल्या तीन फेऱ्यांनंतरही त्यांच्या आवडत्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात. यामुळे विशेष फेरी आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या दोन्ही फेऱ्या झाल्यानंतर चित्र आणखी स्पष्ट होईल.

विरारमधील रिक्षाचालकाला आदित्य ठाकरेंकडून एक लाख रुपयांचे खास बक्षिस!

मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र झुंजारराव म्हणाले, अनेकवेळा महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाकडून त्यांच्या महाविद्यालयाचे विपणन योग्य पद्धतीने केले जात नाही. त्याचबरोबर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अतिरिक्त सोयीसुविधाही दिल्या जात नाहीत. महाविद्यालयांनी त्यांच्याकडील चांगल्या सुविधांची जाहिरात केली पाहिजे. त्यामुळेच विद्यार्थी प्रवेशासाठी त्यांच्याकडे येतील.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील एकूण महाविद्यालये - २९६

यंदा उपलब्ध असलेल्या एकूण जागा - १०४१३९

गेल्या वर्षी २०१८ मध्ये रिक्त राहिलेल्या जागा - ३०७४३