पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात पुढील दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा

पुण्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज

पुण्यासह परिसरात पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगरमध्ये ४ मिमी, लोहगाव १३ मिमी, पाषाण २३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.   

राम मंदिरासाठी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा - नरेंद्र मोदी

यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पुण्यात ८४० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास यंदाच्या मोसमात पाऊस हजार मिमीचा टप्पा पार करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पावसामुळे, प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसर, जहांगीर रुग्णालय, जेएम रोड आणि कर्वे रस्त्यावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती.

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये दिवाळी बोनस

बालगंधर्व चौक, जंगली महाराज रस्ता आणि पुणे रेल्वे स्टेशन परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते.  पुढील दोन दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.