पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुळशीत २४ तासांत ४३४ मिमी पाऊस, पानशेतही १०० टक्के भरले

खडकवासला धरण

पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सगळ्याच धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ताम्हिणीमध्ये ४३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे आता या धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येणार असल्याचे टाटा पॉवर आणि तहसील प्रशासनाने कळविले आहे. दुसरीकडे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पामध्ये शनिवारी सकाळपर्यंत ९३ टक्के पाणी जमा झाले आहे. 

आमचा संवाद नागरिकांशी, त्यांचा ईव्हीएमशी; फडणवीस यांचा विरोधकांना टोला

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुळशी धरणामध्ये शनिवारी सकाळी ४० ते ४५ हजार क्युसेक्स पाणी येते आहे. त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने १५००० क्युसेक्स वरून २०,००० क्युसेक्स, २५००० क्युसेक्सपर्यंत पाणी सोडण्याचा वेग वाढविण्यात येईल. यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये शनिवारी सकाळपर्यंत २७.१३ अब्ज घनफूट (टीएमसी) साठा झाला आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या ९३.०१ टक्के आहे. गतवर्षी याच दिवशी प्रकल्पात ८६.९१ टक्के इतकाच साठा होता.

७ महिन्यांच्या गर्भवतीला व्हॉट्सअ‍ॅपवर तलाक, पहिला गुन्हा मुंब्रात

धरण आणि साठा टीएमसीमध्ये
खडकवासला - १.९७ (१०० टक्के)
पानशेत - १०.६५ (१०० टक्के)
वरसगाव - ११.५५ (९० टक्के)
टेमघर - २.९५ (७९ टक्के)

खडकवासला प्रकल्पातून सकाळी ११ वाजल्यापासून २७२०३ क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जाते आहे. धरणात येणारे पाणी विचारात घेऊन यामध्ये आणखी वाढ किंवा घट केली जाऊ शकते.

पवना धरणही भरले
पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरणही भरल्यात जमा आहे. या धरणामध्ये ९७.१७ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासात ११५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.