पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात साडी दुकानाला आग, ५ कामगारांचा होरपळून मृत्यू

देवाची ऊरळी येथील राजयोग साडी सेंटरला आग (ANI)

पुण्यातील देवाची ऊरळी येथील राजयोग साडी सेंटरला आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीत दुकानातील साड्या आणि इतर लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे. आग विझविण्यात आली असून सध्या तिथे कुलिंग ऑपरेशनचे काम सुरु आहे.

मुंबईत रस्ते अपघात सर्वाधिक, पण मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण घटले

देवाची ऊरळी गावातील राजयोग साडी सेंटरला पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि १० खासगी टँकर घटनास्थळी दाखल झाले. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. पण, दुकानात पाच कामगार होते. आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. सूरज शर्मा (२५), गोपाल चांडक (२३) ,राकेश चौधरी (२४), राकेश मेघवाल (२०), धर्माराम बडियासर (२४) अशी मृतांची नावे आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इंदापूरमध्ये प्रेमप्रकरणातून मुलाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न