पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डीएसकेंच्या संपत्तीचा लिलाव होणार, कोर्टाचे आदेश

डीएसके

डीएसके समूहाच्या गुंतवणूकदारांना दिलासा देणारा आदेश न्यायालयाने दिला आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि राज्य शासनाने जप्त केलेल्या डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी जाहीर नोटीस काढावी, असा आदेश सोमवारी न्यायालयाने दिला आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांचे नातेवाईक यांच्या ४६३ स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. ठेवीदारांचे पैसे परत मिळावे म्हणून त्यांची विक्री करावी, अशी मागणी करण्यात आली होती. 

मोबाइल गेमचे आमिष दाखवत सहा वर्षाच्या मुलीवर तरुणाचा बलात्कार

नोटीस काढल्यानंतर संबंधित संपत्तीबाबत कुणाची हरकत असल्यास त्यांनी ३ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहून आपल्या हरकती नोंदवाव्यात. त्या हरकतींचा निपटारा झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही न्यायालयाने सांगितले.

साई जन्मस्थान वाद मिटला? पाथरीचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास होणार

संपत्तीची विक्री केल्यानंतर त्यातून मिळालेले पैसे पहिल्यांदा डीएसके यांनी ज्या बँकांतून कर्ज घेतले त्यांना देण्यात येणार आहेत. त्यानंतर शिल्लक राहिलेले पैसे ठेवीदारांना देण्यात येतील. पुणे, वणी आणि लोणावळा यासह राज्यभरात डीएसके यांची संपत्ती आहे. त्याच्या विक्रीतून सुमारे दीड हजार कोटी रुपये जमा होऊ शकतात, अशी माहिती विशेष सरकारी वकिलांनी दिली.

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून उस्मानाबाद जिल्हा कृषी कार्यालयात तोडफोड