पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऐन निवडणुकीत पुण्यात काँग्रेसला आणखी एक धक्का

सदानंद शेट्टी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाला अजून एक धक्का बसला आहे. पुणे शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी शुक्रवारी सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. विशेष म्हणजे ऐन निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत पुणे विमानतळावर हा पक्षप्रवेश झाला. 

कलम ३७० हटवले त्याबद्दल अभिनंदन! पण...

खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्त्वाखाली आपण भाजपमध्ये प्रवेश करतो आहे, असे सदानंद शेट्टी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. सदानंद शेट्टी हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्यही होते. त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

ब्लू फिल्म काढली असती तर बरं झालं असतं'

काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांचा भोसरी मतदारसंघात रोड शो होता. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडमध्ये सभाही होती. यासाठी ते पुण्यामध्ये आले होते. गुरुवारीही शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेटमधील काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.