पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अतिवृष्टीने बाधित शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम

राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. दरम्यान, शनिवारी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुरंदर तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीची पाहणी केली. 

राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी, काळेवाडी आणि सोनोरी गावात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाईबाबत तातडीने पंचनामे करुन मदत देऊ असे आश्वासन दिले. तसंच त्यांनी संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांना आदेश दिले.

आमचं ठरलंय, आम्ही विरोधी पक्षातच बसणार: अजित पवार