पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात ३ लाख ट्रिपल लेअर सर्जिकल मास्कची खरेदी

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तीन लाख ट्रिपल लेअर सर्जिकल अल्ट्रासोनिक मास्क खरेदी करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्याला ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास होणार

पुणे पोलिस आयुक्त कार्यालयासाठी दहा हजार मास्क, तर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयासाठी सात हजार मास्क तसेच पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाला दहा हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत. याबरोबरच सर्व तहसिलदार कार्यालयांना प्रत्येकी एक हजार प्रमाणे पंधरा हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत.

'कामगाराला कोरोना झाल्यास मालकाविरुद्ध कारवाईचा प्रश्नच येत नाही'

पहिल्या टप्यात एकुण ४२ हजार मास्क वितरीत करण्यात येत आहेत. उर्वरित मास्क टप्याटप्याने सर्व संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

ब्राव्हो मुकेश!, फेसबुक-जिओ डीलवर आनंद महिंद्रांचे टि्वट