पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणेकरांना हेल्मेट वापरावेच लागणार, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यातील दुचाकी स्वारांना हेल्मेट वापराच्या सक्तीसंदर्भात शिथिलता दिल्याच्या वृत्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुणे शहरातील लोक प्रतिनिधींनी हेल्मेट सक्तीच्या कारवाई संदर्भात भेट घेतल्याच्या वृत्ताला त्यांनी यावेळी दुजोरा दिला. पण हेल्मेट सक्ती कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हेल्मेट शिवाय दुचाकीवरुन फिरणाऱ्या चालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावेच लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी हेल्मेट सक्ती शिथिल केल्यासंदर्भातील ट्विट आमदार माधुरी मिसाळ यांनी केले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांना विधीमंडळाबाहेर स्पष्टीकरण द्यावे लागले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे शहरातील लोक प्रतिनिधींनी आज हेल्मेट सक्तीसंदर्भातील कारवाईच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली. आमचा हेल्मेट सक्तीला विरोध नाही, पण चालकांविरोधात पोलिसांचे ज्याप्रमाणे कारवाई सत्र सुरु आहे त्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. पोलिसांकडून चौका-चौकात गटाने थांबून चालकांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाला समोरे जावे लागत आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रास कमी करण्यासंदर्भात पोलिसांना सूचना दिल्या आहेत.

पुण्यातील हेल्मेट सक्तीला स्थगिती, मुख्यमंत्र्यांनी दिली सूचना

मुंबई आणि नागपूरप्रमाणे सीसीटीव्हीच्या माध्यमातून हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अशा सुचना पोलिसांनी दिल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले. हेल्मेट सक्ती ही जनतेच्या हितासाठी आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने ही सक्ती करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ई-चलनाद्वारे कारवाई करावी. त्यामुळे चालक पुन्हा नियमाचे उल्लंघन करणार नाहीत, असेही ते यावेळी म्हणाले.