पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे अपघात : जाताना जिथे सेल्फी काढला, येताना तिथेच मृत्यूने गाठले!

तरुणांनी घेतलेला ग्रुप सेल्फी

पुणे सोलापूर रस्त्यावर कदमवाक वस्तीजवळ शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या भीषण अपघातात ९ तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात जिथे झाला त्या ठिकाणाबद्दल मिळालेली माहिती काळजात धस्स करणारी आहे. रायगडला जाताना या सर्व तरुणांनी जिथे ग्रुप सेल्फी घेतला होता. त्या ठिकाणाजवळ घरी परतताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. याच अपघात सर्व तरुणांना आपला प्राण गमवावा लागला. कदमवाक वस्तीजवळ हा अपघात झाला. तरुणांनी सहलीला जाताना घेतलेल्या सेल्फीचे छायाचित्रही सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहे.

यवतचे राहणारे असणाऱ्या नऊ तरुणांचा शुक्रवारी रात्री पुणे सोलापूर रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला. हे सर्व तरुण एक दिवसासाठी रायगडला सहलीला गेले होते. रात्री परतताना त्यांनी पुण्यात जेवण केले आणि कुटुंबियांना फोनही केला. त्यानंतर पुण्यातून पुढे जाताना अपघातात सर्वांचा मृत्यू झाला. 

पुणेः सहलीवरुन परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारला अपघात, ९ जण ठार

अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमंद अश्पाक अत्तार, परवेज अश्पाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत दिघे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजीज (सर्वजण रा. यवत) अशी मृतांची नावे आहेत. सर्व मृत हे पंचविशीतील आहेत. 

शुक्रवारी रात्री उशिरा अडीचच्या सुमारास कदमवाक ग्रामपंचायतीजवळ आल्यानंतर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला ओलांडून विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला होता.