पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२ कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; तिघांना अटक

महिलेसमोर अश्लिल कृत्य करणाऱ्याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यामध्ये व्यापाऱ्याचे अपहरण करुन दोन कोटींची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एका रात्रीत श्रीमंत होण्यासाठी आरोपींनी व्यापाऱ्याचे अपहरण केले होते. मात्र पुणे पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपींना अटक करत व्यापाऱ्याची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर एक जण फरार आहे. त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. 

महात्मा गांधींचा मृत्यू अपघाती; ओडिशामध्ये राजकारण तापले

कांतीलाल गणात्रा असे अपहरण करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. कांतीलाल गुरुवारी रात्री घरी जात होते. त्याचवेळी आरोपींनी त्यांचा पाठलाग करत कारमधून त्यांचे अपहरण केले होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका नागरिकाने संबंधित माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या माहितीच्या आधारे कांतीलाल यांच्या घरचा पत्ता शोधून काढला. दरम्यान, आरोपींनी कांतीलाल यांच्या कुटुंबियांना त्यांच्याच मोबाईलवरुन २ कोटींच्या खंडणीसाठी फोन केला. पैसे दिले नाही आणि पोलिसांना सांगितले तर कांतीलाल यांना मारुन टाकू अशी धमकी आरोपींनी दिली. 

रायगड : क्रिप्टझो कंपनीत स्फोट; दोघांचा मृत्यू तर १६ जखमी

दरम्यान, आरोपींनी कांतीलाल यांच्या कुटुंबियांना पैसे घेऊन चांदणीचौक परिसरामध्ये बोलवले. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला. पैसे घेण्यासाठी आलेल्या आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली. तर इतर दोघे जण पैसे घेऊन फरार झाले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी कांतीलाल यांना खेडशिवापूर येथे सोडून दिले. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीवरुन पोलिसांनी आणखी एकाला अटक केली तर एक जण फरार आहे. 

... अशा शेजाऱ्याशी कोण चर्चा करेल, जयशंकर यांनी पाकला फटकारले

पोलिसांनी आरोपींकडून दीड कोटींची रक्कम, अपहरणासाठी वापरलेली गाडी, दुचाकी जप्त केली आहे. अजय बाळासाहेब साबळे (२४ वर्ष), सुजित किरण गुजर (२४ वर्ष), ओंकार वाल्हेकर (२० वर्ष) अशी आरोपींची नावे आहेत. या गुन्हाच्या मुख्य सुत्रधार अमित जगताप (२० वर्ष) हा फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, श्रीमंत होण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केले असल्याचे चौकशी दरम्यान सांगितले. 

दिशाभूल करण्याचा हेतू नाही, सई, सिद्धार्थचं स्पष्टीकरण