पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यामध्ये दुप्पट दराने मास्कची विक्री करणारे ४ मेडिकल सील

पुण्यातील ४ मेडिकल सील

पुण्यामध्ये कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. आशामध्ये मेडिकलवाल्यांकडून नागरिकांची फसवणूक सुरु आहे. दुप्पट किंमतीला मास्क आणि सॅनिटायझरची विक्री केली जात आहे.  या मेडिकलविरोधात नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. अशा ४ मेडिकलवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. 

IPLची सुरुवात १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली, बीसीसीआयचा निर्णय

पुण्यामध्ये मास्क, सॅनिटायझर आणि औषधांचा काळा बाजार होत असल्याची माहिती समोर आली होती. १५० रुपयांचे मास्क ३०० रुपयांनी विकले जात होते. यासंदर्भात नागरिकांकडून देखील तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीच्या आधारे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ४ मेडिकलविरोधात कारवाई केली. पुण्याच्या कोथरुड परिसरातील २, गोखलेनगर परिसरातील एक आणि म्हाळुंगेमधील एक मेडिकल अन्न आणि औषध प्रशासनाने सील केले आहे.  

... या देशातील एअर इंडियाची विमानसेवा ३० एप्रिलपर्यंत रद्द

कोथरूड येथील मेट्रो मेडिकल आणि न्यू पूजा केमिस्ट, गोखले नगर येथील ओम केमिस्ट आणि म्हाळुंगे येथील महालक्ष्मी मेडिकलवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील आदेश येइपर्यंत हे मेडिकल बंद ठेवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. पुण्यामध्ये कोरोनाचा पादुर्भाव वाढत चालला आहे. अशात पुण्यामध्ये कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

खूशखबर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ