पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात माणुसकीचे दर्शन; ईद साजरी न करता पूरग्रस्तांना केली मदत

पुणे मुस्लिम बांधव

आज देशभरामध्ये ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मात्र पुण्यातल्या ३०० मुस्लिम कुटुंबियांनी ईद साजरी केली नाही. पूराचा फटका बसलेल्या कोल्हापूर आणि सांगलीकरांच्या मदतीसाठी या मुस्लिम बांधवांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. ईद साजरी करण्यासाठी साठवलेले पैसे त्यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले आहेत. 

दिल्ली ते लाहोर बससेवाही स्थगित

पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे आलेल्या महापूराचा फटका सांगली, कोल्हापूरला मोठ्या प्रमाणात बसला. पूरामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. अनेक नागरिकांचे संसार या पूरामुळे उध्वस्त झाले. २९ जणांचा या पूरामुळे मृत्यू झाला तर अनेक जण बेपत्ता झाले. दरम्यान, सांगली, कोल्हापूरकरांची अवस्था पाहून अनेक जण त्यांच्या मदतीसाठी धावून आले. अनेक राजकीय पक्ष, स्वंयसेवी संस्था त्याचसोबत काही दयावान व्यक्तींनी त्यांच्या मदतीसाठी हात पुढे केले.  

पूरग्रस्तांसाठी बॉलिवूड कलाकारांची मदत का नाही?- अमेय खोपकर

पुण्यामध्ये देखील असेच माणुसकीचे दर्शन दिसून आले आहे. पुण्यातल्या ३०० मुस्लिम कुटुंबियांनी इस्लाममधील महत्वाचा मानला जाणारा बकरी ईद हा सण साजरा केला नाही. यासर्व कुटुंबियांनी एकत्रित पैसे जमा करुन सांगली, कोल्हापूरकरांसाठी अन्न, धान्य, कपड्यांची खरेदी केली.  ईदच्या मुहुर्तावर ते या लोकांना ही मदत करत आहेत. या सर्व मुस्लिम बांधवांचे खूप कौतुक होत आहे. 

आलमट्टीतून विसर्ग आणखी वाढविला...

सामाजिक कार्यकर्ते एजाज काझी यांनी सांगितले की, 'माझ्या आयुष्यातली ही पहिली ईद आहे जी मी साजरी केली नाही. ईदच्या दिवशी पूरग्रस्त जिल्ह्यामध्ये आम्ही अन्न, धान्य आणि इतर आवश्यक वस्तू घेऊन जात आहोत. आमच्यासोबत ४ ट्रक आहेत. माझ्यासारख्या पुण्यातील ३०० मुस्लिम बांधवांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला. या सर्व मुस्लिम बांधवांनी बकरी खरेदीसाठी आणि नविन कपडे खरेदीसाठी पैसे साठवलेले होते. ते पैसे त्यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले आहेत.'

रोहितचा हटके अंदाजातील फोटो होतोय व्हायरल!

पुण्यातील प्राध्यापक गुलाम हुसेन हे सध्या सांगलीमध्ये आहेत. त्यांनी हिंदुस्थान टाइम्सला सांगितले की, 'मी गेल्या आठ दिवसांपासून सांगलीत आहे. शक्य तितक्या पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. इथली पूर परिस्थिती पाहता कोणताही मुस्लिम व्यक्ती ईद साजरी करणार नाही. पूरामुळे बर्‍याच मुस्लिम व्यक्तींची घरं, रोजगार गेला आहे. त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीच नाही. ईदसाठी खरेदी केलेल्या बकऱ्या पूरात वाहून गेल्या. अशी परिस्थिती पाहता ईद साजरी करणे हे शक्यच नाही. म्हणूनच आम्ही सुध्दा ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला.'

मोदींचा सहभाग असलेल्या 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'चे आज प्रसारण

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pune 300 muslim family eid celebration of sacrifice to help kolhapur and sangli flood victims