पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात आरोपींना शिक्षा देण्याचे प्रमाण वाढले, खुनाच्या घटनाही वाढल्या

मुंबई पोलिस

पुण्यामध्ये २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये खून होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही वाढ किरकोळ स्वरुपाची असली तरी हे प्रमाण वाढते आहे ही जास्त चिंतेची स्थिती आहे. पुणे पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पुण्यात २०१८ मध्ये पुण्यात ७२ खूनाच्या घटना घडल्या होत्या. २०१९ मध्ये ही आकडेवारी ७४ इतकी झाली आहे. 

आर्थिक मंदीचा परिणाम, मुंबईत सदनिकांच्या विक्रीत घट

गुन्हेगारांना शिक्षा देण्याच्या प्रमाणात गतवर्षात वाढ झाल्याचेही पुणे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये हे प्रमाण वाढले आहे. २०१९ मध्ये गुन्हेगारांना शिक्षा होण्याची टक्केवारी ६४ इतकी होती, असे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते. २०१९ मध्ये खुनाच्या ज्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ७१ प्रकरणांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. २०१८ मधील ७२ खुनाच्या घटनांपैकी ७१ प्रकरणांचा उलगडा करण्यात यश आले आहे. 

पुण्यामध्ये चुकीच्या दिशेने गाडी चालविण्याचा प्रकार सर्रास होताना दिसतो. या प्रकरणी पुणे पोलिसांनी जून २०१९ मध्ये मोठी कारवाई केली होती. यावेळी चुकीच्या दिशेने गाडी चालविणाऱ्या गाडीस्वारांवर भारतीय दंडविधान संहितेतील कलम २७९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. सार्वजनिक रस्त्यावर वेगाने गाडी चालविल्यास या कलमाखाली गुन्हा दाखल केला जातो. यानंतर लगेचच संबंधित आरोपींवर आरोपपत्र दाखल करून या प्रकारच्या गुन्ह्यांचा निपटारा करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.

इराकमधील भारतीयांसाठी आणि हवाई प्रवासासाठी केंद्राचा महत्त्वाचा सल्ला

भारतीय दंडविधान संहितेतील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याचे प्रमाण २०१६ मध्ये ३६.३१ टक्के होते. २०१७ मध्ये त्यात आणखी घसरण झाली. ते २९.७६ टक्क्यांवर जाऊन पोहोचले. २०१८ मध्ये त्यात ३९.३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. हेच प्रमाण २०१९ मध्ये ६४.०६ टक्क्यांपर्यंत गेले आहे.