पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खेड-शिवापूर टोलनाक्यावर पुणे, पिंपरीच्या गाड्यांना टोलमाफ

खेड-शिवापूर टोलनाका

पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाका हटवण्याच्या मागणीसाठी रविवारी टोल हटाव कृती समितीने आंदोलन केले. सर्वपक्षियांनी एकत्र येत धरणे आंदोलन केले. तीन तासांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे या देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी कृती समिती पदाधिकारी, सुप्रिया सुळे आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची बैठक झाली. पुणे आणि पिंपरीच्या गाड्यांना यापुढे टोलमाफ करण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला. 

अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा झाले दिल्लीचे मुख्यमंत्री

खेड-शिवापूर टोलनाक्यावर आजपासून पुणे आणि पिंपरीवरुन जाणाऱ्या MH12 आणि MH14 पासिंगच्या वाहनांना टोल आकारण्यात येणार नाही असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. टोल हटवण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक होणार आहे. जोपर्यंत कायमस्वरुपी निर्णय होत नाही तोपर्यंत पुणे, पिपंरीच्या गाड्यांना टोलमाफ देण्यात येणार आहे. जर टोलनाका हलवला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करु, असा इशारा टोल हटाव कृती समितीने दिला आहे. आंदोलना दरम्यान टोलनाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत १,६६५ नागरिकांचा मृत्यू

आंदोलनामुळे पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा प्रश्न आणि कोंडी निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता. सातारा वाढे फाटा-वाठार स्टेशन-फलटण-लोणंद मार्गे पुणे, जोशी विहिर वाठार मार्गे लोणंद-निरा-जेजुरी मार्गे पुणे, खंडाळा-लोणंद मार्गे पुणे, शिरवळ-लोणंद मार्गे-निरा-जेजुरी मार्गे पुणे, वाई-शहाबाग फाटा-ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार, वाई-एमआयडीसी फाटा मार्गे शहाबाग फाटा- ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार, अजवड वाहने वाढे फाटा मार्गे वाठार-लोणंद मार्गे पुण्याकडे वाहतूक वळवण्यात आली होती. 

राज्य सरकारला सुध्दा स्वतंत्र चौकशीचा अधिकार: शरद पवार