पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सशस्त्र सेना ध्वज दिनी PM मोदींच्या हस्ते निधीसंकलनाचा शुभारंभ

नरेंद्र मोदींच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसंकलनाचा शुभारंभ

पुण्यातील राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्यावतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा गोसावी व त्यांची मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला. 

पुण्यात PM मोदींचं CM ठाकरेंकडून स्वागत तेही फडणवीसांच्या उपस्थितीत

यावेळी छोट्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जॅकेटवर झेंडा लावला. सशस्त्र दलाच्या कल्याणासाठी मोदींनीही मदत दिली. सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त सैन्याच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या धैर्याला अभिवादन करतो. सैन्याच्या हितासाठी आपण योगदान करावे, असे आवाहन देखील मोदींनी भारतवासियांना केले. ७ डिसेंबर १९४९ पासून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर धारातीर्थ पडलेल्या शहीद जवानांच्या सन्मानार्थ देशभरात सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यात येतो.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यात आगमन

 देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. मोदी  शुक्रवारी रात्री वायुसेनेच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केल्याचे पाहायला मिळाले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Prime Minister Narendra Modi hailed the courage of soldiers of Armed Forces and their families on Armed Forces Flag Day in pune