देशव्यापी लॉकडाउनचा कालावधी हा अंतिम टप्प्यात असताना पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगच्या पार्श्वभूमीवर बॅरिकेट्स लावण्यात येत आहेत. लॉकडाऊनचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर स्थानकावर प्रवाशांची गर्दी होऊ नये, याची दक्षता म्हणून रेल्वे पोलिसांनी पूर्वतयारी सुरु केल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील वाढत्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाला नियंत्रित करण्यासाठी २५ मार्च पासून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती. कोरोना विषाणूची परिस्थिती जैसे थे कायम दिसल्यानंतर तसेच वेगवेगळ्या राज्यांनी कालावधी वाढवण्याची विनंती केल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी १९ दिवसांनी वाढवत ३ मेपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन कायम राहिल, असे स्पष्ट केले होते.
हैदराबादमध्ये स्थलांतरीत मजूर रस्त्यावर, पोलिसांवर दगडफेक
कोरोनाचा सामना करत असताना लॉकडाऊमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्याच्या हेतून केंद्र सरकारने ग्रामीण भागासह कोरोनाच्या रुग्ण न आढळलेल्या भागात काही प्रमाणात शिथिलताही दिली होती. दरम्यान सध्याच्या घडीला देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले असून मुंबई, पुणे आणि नागपूरमधील मालेगावत कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा अद्यापही कामय आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून प्रतिदिन येणाऱ्या आकडेवारीमध्ये दिसणारा चढ-उतार हा चिंतेचा विषय बनला आहे.
अष्टपैलू अभिनयासाठी इरफान खान कायम स्मरणात राहतील - मोदी
देशव्यापी लॉकडाऊनमध्ये ज्या भागांना शिथिलता देण्यात आली होती. त्यामधून मुंबई-पुणे-मालेगाव या ठिकाणांना वगळण्यात आले होते. एवढेच नाही तर लॉकडाऊनचे निर्बंध कायम राहणार असल्याचे देखील राज्य सरकार आणि प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गरज पडल्यास महाराष्ट्रातील काही भागातील लॉकडाऊनचा कालावधी १८ मेपर्यंत वाढवण्याची शक्यताही वर्तवली होती. याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान पुणे रेल्वे पोलिस दलाने स्थानकावरील गर्दी टाळण्याच्या उद्देशाने पूर्वतयारी सुरु केली आहे.