पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आपण महान कलाकार गमावला, नेत्यांनी नटसम्राटाला वाहिली श्रद्धांजली

राजकीय नेत्यांनी डॉ. श्रीराम लागूंना वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसह सामाजिक भान असलेले अभिनेते अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. 

रंगभूमीचे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड

आपण एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व गमावले : प्रकाश जावडेकर

केद्रींय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सर्वकाली महान कलाकार श्रीराम लागू यांना श्रद्धांजली. आपण एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व गमावले आहे. थिएटर अभिनेत्याने रुपेरी पडद्यावरही आपले अधिराज्य गाजवून आपला प्रभाव निर्माण केला. कलेप्रबरोबरच त्यांनी सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले, अशी प्रतिक्रिया प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. 

...म्हणून बॉलिवूड अभिनेत्री रेणुका शहाणेंनी साधला PM मोदींवर निशाणा

त्यांनी पुरोगामी चळवळीबद्दलची बांधिलकी आयुष्यभर जपली : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विटरच्या माध्यामातून डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन झाले. पुरोगामी चळवळीबद्दलची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. रंगभूमी, चित्रपट या क्षेत्रात त्यांचे अतुलनिय योगदान आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 

श्रीराम लागू अभिनय जगतातील 'सिंहासन': देवेंद्र फडणवीस

गेली अनेक दशके सिनेमा, नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी रसिकजनांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आपल्यातून निघून जाणे अतिशय दुःखद आहे.‬ ‪डॉ. लागू हे अभिनय जगतातील 'सिंहासन' होते. या 'कलेच्या चंद्रा'ने 'सामना', 'पिंजरा' असे अनेक चित्रपट गाजवले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे ट्विट भाजपचे नेते आणि विधानसभ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ‬ अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मुलनासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. अण्णा हजारे यांच्या लढ्यातही त्यांचा वाटा होता. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टी सुद्धा त्यांनी गाजवली. त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या, आप्तस्वकियांच्या, कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे, असा उल्लेख फडणवीसांना आपल्या ट्विटमध्ये केलाय.

डॉ श्रीराम लागू यांना सामाजिक कृतज्ञता निधीच्या वतीने विनम्र आदरांजली

महाराष्ट्रातील उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आर्थिक शिष्यवृत्ती, प्रशिक्षण आणि पुरस्कार देण्यासाठी स्थापन झालेल्या सामाजिक कृतज्ञता निधीचे डॉ लागू संस्थापक अध्यक्ष होते. हा निधी उभा करण्यात त्यांनी मोठा हातभार लावलाच त्याचबरोबर वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय पध्दतीने विचार करण्याची सवय कार्यकर्त्यांना लागावी यासाठी ते कार्यकर्त्यांशी सतत संवाद करायचे. त्यांच्या परखड बुध्दीप्रामाण्यवादी विचारांचा मोठा वारसा आम्हा कार्यकर्त्यांना सतत मार्गदर्शन करत राहील. - सुभाष वारे कार्यवाह, सामाजिक कृतज्ञता निधी

महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला : शरद पवार

वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर आहे. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!