पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'डॉ. आंबेडकर स्मारकाला माझा विरोध, तो निधी वाडिया रुग्णालयाला द्या'

प्रकाश आंबेडकर

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला माझा विरोध आहे. या स्मारकासाठी जो निधी देण्यात येणार आहे. तो निधी वाडिया रुग्णालयासाठी देण्यात यावा, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. निधी अभावी वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. सरकार आणि महापालिकेने अनुदान थकवल्यामुळे वाडिया रुग्णालयावर ही वेळ आहे. यासंदर्भात बोलताना पुणे येथे प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली आहे.

'मेगाभरतीचा निर्णय कोअर कमिटीचा, माझ्या एकट्याचा नाही'

स्मारकाची उंची वाढवण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत मात्र वाडिया रुग्णालयाला देण्यासाठी पैसे नाहीत असा सवाल करत मुंबई हायकोर्टाने सरकारला धारेवर धरले होते. दरम्यान, यासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे की, 'माझी कोर्टाला नम्र विनंती आहे की इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याबाबत वाद आहे. माझाही या स्मारकाला विरोध आहे. इंदू मिलची जागा ही बुद्धिमत्तेच्या कारणसाठी वापरली गेली पाहिजे. डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाला लागणारा निधी वाडिया रुग्णालयाला द्या असे त्यांनी सांगितले. 

'...तर राहुल गांधींना सर्वात आधी अंदमानच्या तुरुंगात पाठवावे लागेल'

दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी हे अनेकदा चैत्यभूमीला येऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांना ती जागा माही होती. म्हणूनच त्यांनी ती जागा इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्टडीजसाठी दिली होती. मात्र या ठिकाणच्या राजकारण्यांनी ही जागा बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी वापरली आहे. त्यामुळे मी हायकोर्टाला विनंती करतो की, जो निधी स्मारकासाठी दिला जाणार आहे तो निधी वाडिया हॉस्पिटला देण्यात यावा असे आदेश त्यांनी काढावे, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे. 

लोकलमध्ये केवळ रविवारी चोरी करणाऱ्या सोनसाखळी चोरास अटक