पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रसुती वेदनेनं तळमळणाऱ्या महिलेसाठी पोलिसांची कर्तव्यदक्षता!

खाकी वर्दीतील योद्ध्यांनी केली  प्रसुती वेदनेनं तळमळणाऱ्या महिलेची मदत

कोरोना विषाणूमुळे देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावर एकही वाहन धावताना दिसत नाही. रस्त्यावर फिरणाऱ्यांविरोधात पोलिस सध्या सक्तीचे धोरण अवलंबताना दिसत आहेत. परंतु, पिंपरीमध्ये हेच पोलिस एका गरोदर महिलेसाठी देवदूतासारखे धावून आले. प्रसव वेदना होत असलेली एक नऊ महिन्यांची गरोदर महिला रिक्षाने रुग्णालयाकडे निघाली. परंतु, तिच्या दुर्दैवाने त्या रिक्षातील पेट्रोल संपले आणि रिक्षा जागेवरच बंद पडली. सायंकाळची वेळ आणि रस्त्यावर कोणीच नव्हते. त्यावेळी पोलिस मदतीला धावून आले. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी पेट्रोलपंपावरुन पेट्रोल आणून रिक्षा सुरु करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तेथून महापालिका कर्मचाऱ्यांचे वाहन जात होते. पोलिसांनी त्या वाहनाला थांबवून त्या महिलेला रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे अडचणी सापडलेल्या महिलेवर वेळेत उपचार झाले. 

'ना'पाक डाव; ४५० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत


दि. २४ एप्रिल रोजी स्पाईन रस्त्यावरील जाधववाडी चौकाच्या काही अंतरावरुन एक रिक्षा जात असताना अचानक पेट्रोल संपल्याने ती रस्त्यातच बंद पडली. या रिक्षात चालकासह एक कुटुंब उभे होते. पती, पत्नी, दोन मुले. यापैकी महिला गरोदर होती. तिला प्रसव वेदना होत होत्या. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाकडे ते निघाले होते. लॉकडाऊनमुळे रस्त्यावर दुसरे वाहनही रस्त्यावर दिसत नव्हते. महिलेच्या वेदना वाढतच होत्या. पुढच्याच चौकात काही पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर होते. रिक्षाचालकाने ही बाब या पोलिसांच्या लक्षात आणून दिली. या ठिकाणी चिखली पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक दीपाली मुंढकर, हवालदार तारळकर, महिला कॉन्स्टेबल रेखा गायकवाड, रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ नाईकनवरे, वाहतूक विभागाचे संजय खंडाळे, होमगार्ड शरद मुसळे, रवींद्र खेंगले आदींचे पथक तैनात होते. 

संकटाच्या काळातही काही जणांकडून राजकारण, CM ठाकरेंची टीका

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या पोलिसांनी तत्परता दाखविली. जवळच्या पेट्रोलपंपावरुन पेट्रोल आणून त्यांनी रिक्षात भरण्यास चालकाकडे दिले. याचवेळी चौकाच्या दिशेने एक वाहन येताना दिसले. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिका विद्युत विभागाचे पथदिवे निगराणी पथक होते. त्यात वायरमन अंकुश लांडगे, जीपचालक रामदास गवारी आणि मदतनीस विलास माने असे तिघेजण होते. या तिघांना दीपाली मुंढकर यांनी गर्भवतीला डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यावर पालिका कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांची परवानगी घेवून गर्भवतीसह तिचा पती आणि दोन्ही मुलांना वाहनात घेऊन रुग्णालय गाठले आणि त्या गर्भवतीवर वेळीच उपचार सुरू झाले.

अक्षय तृतीयानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोगरा फुलांची आरास