पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: लॉकडाऊनचे उल्लंघन करत मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना अनोखी शिक्षा

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना अनोखी शिक्षा

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र अनेक जण लॉकडाऊनचे उल्लंघन करताना दिसत आहेत. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत आहे. पुण्यामध्ये असेच लॉकडाऊनचे उल्लंघन करुन मॉर्निंग वॉकला आलेल्यांना पोलिसांनी अनोखी शिक्षा दिली आहे. 

'लॉकडाऊन हे काही कोरोनावर उत्तर नाही, तो केवळ तात्पुरता पर्याय'

पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात लॉकडाऊनचे उल्लंघन करुन अनेक जण मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. त्यांना पोलिसांनी एक अनोखी शिक्षा दिली. या सर्वांनी रस्त्यावर उभे करुन त्यांच्याकडून योगा करुन घेतला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे योग्य ते पालन करण्यात आले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हीडिओ शेअर केला आहे.  

आर्थिक क्षेत्रात भारताने उचललेले पाऊल योग्यः आयएमएफ

दरम्यान, पुण्याच्या चतुश्रुंगी, डेक्कन, फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या पुणेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सेनापती बापट आणि भोसले परिसरात ३० ते ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सुद्धा पुणे पोलिसांनी मॉर्निंग वॉकला गेलेल्या अनेकांविरोधात कारवाई करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. 

चिंताजनकः सोलापुरात १० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले