पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PMPMLचा नवा उपक्रम, ११ मार्गांवर शटल बससेवा

संग्रहित छायाचित्र

जास्त प्रवासी असण्याच्या वेळी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या pmpml बसमधील गर्दी कमी करण्यासाठी नवी योजना आखण्यात आली आहे. एकूण ११ मार्गांवर शटल बससेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपीएमएलने घेतला आहे. येत्या १ जूनपासून ही सेवा सुरू होईल. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा ती सुरू राहिल.

निकाल माझ्यासाठी धक्कादायक - पार्थ पवार

सकाळी ८ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ९ या काळात या शटल बसगाड्या नियोजित मार्गांवर धावतील. पीएमपीएमएलचे वाहतूक संचालक अनंत वाघमारे म्हणाले, शटल सेवेमुळे प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होऊ शकेल. त्याचबरोबर पीएमपीएमएलचा महसूलही वाढेल. शटल सेवेसाठी सुरुवातीच्या टप्प्यात ११ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. इतरही काही मार्गांची चाचपणी केली जात आहे. त्यानंतर या सेवेचा आणखी मार्गांवर विस्तार केला जाईल. 

जीममधील अतिव्यायामाने पुण्यातील तरुणाची किडनी निकामी

पुणे शहरामध्ये एकूण ३५० मार्गांवर पीएमपीएमएलची सेवा आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शटल सेवेच्या माध्यमातून पीएमपीएमएलला दररोज प्रत्येक मार्गावर प्रतिदिवशी १० हजार रुपयांचा महसूल मिळेल. शटल सेवेतील सर्व मार्ग कमी लांबीचे आहेत. त्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, असे आम्हाला वाटते.
रिक्षातून जाणारे प्रवासी, बसला गर्दी असते म्हणून इतर वाहनांनी जाणारे प्रवासी, यांना पीएमपीएमएलकडे आणण्यासाठी आम्ही ही योजना आणली आहे. शटल सेवेसाठी ५० बस राखून ठेवण्यात येतील, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

प्रस्तावित मार्ग
स्वारगेट - कात्रज
स्वारगेट - अप्पर इंदिरानगर
स्वारगेट - हडपसर
स्वारगेट - धायरी
डेक्कन - माळवाडी
डेक्कन - कोथरूड डेपो
पुणे स्टेशन - हडपसर
पुणे स्टेशन - वाघोली
पुणे स्टेशन - विश्रांतवाडी
अप्पा बळवंत चौक - सांगवी
पुणे महापालिका - बालेवाडी