पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PMPML बसने सहा वाहनांना उडवले!

पीएमपीएमएलच्या बसने सहा वाहनांना उडवले

पुण्यात पीएमपीएमएल बसने सहा वाहनांना उडवल्याची घटना घडली आहे. पौंड रोडवरील परमहंसनगर चौकात गुरुवारी झालेल्या अपघातात दोन महिला जखमी झाल्या आहेत. कोथरुड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळच्या दरम्यान हा अपघात घडला. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे चालकाने म्हटले आहे. निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी बापू किसन आवटे (वय ३८) या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शाहिन बागमध्ये शांतता, पोलिसांनी रस्ते बंद केलेः मध्यस्थांचा अहवाल

सुखसागरहून कोथरुड डेपोच्या दिशेने जाणाऱ्या पीएमपीएमएल बसने सुरुवातीला दोन दुचाकीला धडक दिली. यात साक्षी दंडवते आणि आदिती कुलकर्णी या दोन महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. या दोन  दुचाकीनंतर बसने सिग्नलला थांबलेल्या तीन कारसह रिक्षाला आणि आणखी एका दुचाकीला धडक दिली.

CAAविरोधात दिल्लीत आणखी एक रस्ता बंद, जाफराबाद येथे आंदोलन

या प्रकरणात साक्षी दंडवते यांनी पोलिसांत तक्रार दाखल दाखल केली आहे. भरधाव वेगाने बसने एक्टिवाला धडक दिल्याचे त्यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. पीएमपीएमएलच्या जनसंपर्क अधिकारी प्रियांका सोनावणे यांनी या घटनेची दखल घेतली आहे. यासंदर्भात प्राथमिक चौकशी सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.