पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

न कळवता परदेशात गेले, पुणे महापालिकेचे तीन अधिकारी निलंबित

पुणे महापालिका

महापालिकेतील आपल्या वरिष्ठांना न कळविता परदेशात गेल्याबद्दल तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी या माहितीला दुजोरा दिला. या संदर्भातील फाईल अंतिम मंजुरीसाठी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे पाठविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

कमलनाथ यांचा राजीनाम्याचा निर्णय, भाजपवर टीका

या तीन अधिकाऱ्यांपैकी एक विद्युत विभागात तर दोन पाणी पुरवठा विभागात कार्यरत आहेत. वैद्यकीय रजा घेऊन हे तिघेही परदेशात फिरायला गेले होते. जर कोणताही शासकीय कर्मचारी परदेशात फिरायला जाणार असेल तर त्याने आपल्या कार्यालयात वरिष्ठांना त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. त्याचवेळी कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे महापालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने शहर सोडून कुठेही जाऊ नये, यासाठीही आयुक्तांनी निर्देश दिले आहेत, असे रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

राज्यात आणखी तिघांना कोरोना, पाच जणांना डिस्चार्ज

एका अधिकाऱ्याने स्वतःचे नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर या तीन अधिकाऱ्यांची नावे सांगितली. कार्यकारी अभियंता मनिषा शेकटकर, कनिष्ठ अभियंता संदीप सपकाळ, उपअभियंता डी एस गायकवाड हे तिघेही दोन आठवड्यांपू्र्वी परदेशात गेले होते. त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली नव्हती. त्यांच्याकडून याबद्दल खुलासा मागविण्यात आला होता. पण त्यांनी परिणामकारक खुलासा दिला नाही. त्यामुळेच त्यांच्याविरोधात निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.