पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे महापालिका बजेट सादर; सारसबागेचे नूतनीकरण, मध्यवस्तीत AC बसेस

पुणे महापालिका

पुणे महापालिकेचा पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सादर केला. ७३९० कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून, त्यामध्ये पुणेकरांसाठी विविध योजना आणि पायाभूत सुविधांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्थायी समितीला ६२२९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामध्ये हेमंत रासने यांनी ११०० कोटी रुपयांची भर घातली आहे. 

हेमंत रासने यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी

पीपीपी मॉडेलनुसार सारसबाग आणि पेशवेपार्कचे नूतनीकरण करणार

दिल्लीत तातडीने लष्कर तैनात करा; केजरीवालांची गृहमंत्रालयाकडे मागणी

शहराच्या मध्यवस्तीत वातानुकूलित बससेवा सुरू करणार. दहा रुपयात संपूर्ण दिवस बसमधून प्रवास करता येणार

शहरात नवे २०० पादचारी पूल उभारणार. या पुलांवर चढण्यासाठी स्वयंचलित जिने असणार

पुण्यात नवे महापालिका रुग्णालय उभारणार

गोवा कला अकादमीच्या धर्तीवर कोथरूडमध्ये कला अकादमी सुरू करणार

शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी आणखी इलेक्ट्रिक बसेस आणणार

पुण्यातील गणेशोत्सवाचे वेगळेपण दाखवणारे कायमस्वरुपी प्रदर्शन केंद्र सुरू करणार

महसूल वाढीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणार

देवेंद्र फडणवीस यांच्या त्या विधानावर आदित्य ठाकरेंचे उत्तर

शिवाजी रस्त्यावरील लालमहाल चौक ते फडगेट पोलीस चौकी येथे ग्रेड सेपरेटर (समांतर विलगक) तयार करणार

बाळ आईच्या पोटात असताना त्याचे हृदय सामान्य पद्धतीने विकसित न झाल्यामुळे नवजात बालकांमध्ये ह्रदयाचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी पुणे महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात बालकांचे हृदयरोग निदान आणि उपचार करणारी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.