पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील हे रस्ते गुरुवारी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

पुणे पोलिसांनी हा आदेश जारी केला आहे. (संग्रहित छायाचित्र)

भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी दुपारी पुण्यातील स प महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या काळात मध्य पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या बदलांबद्दल माहिती दिली. पुण्यातील खालील रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये गुरुवारी, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत गरजेप्रमाणे बदल केले जाणार आहेत. हा सर्व स प महाविद्यालयाजवळचा परिसर आहे.

..असं बोलण्यापेक्षा मेलेलं बरं: उदयनराजे भोसले

जंगली महाराज रस्त्यावर खंडोजीबाबा चौकातून संभाजी पुलाकडे न जाता कर्वे रस्त्याकडे वाहतूक वळविण्यात येईल.

दांडेकर पूलापासून अलका टॉकीज चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या वाहनांनी मित्रमंडळ चौकातून इच्छित स्थळी जाण्याची सूचना करण्यात आली आहे.

स्वारगेटकडून टिळक रस्त्याकडे येणारी वाहतूक पूरम चौकात (अभिनव कला महाविद्यालय) बाजीराव रस्त्याकडे वळविण्यात येईल.

शाहू पूल, दत्तवाडी, जनता वसाहत, पर्वती पायथा या मार्गाने येणारी वाहतूक नाथ पै चौकातून स प महाविद्यालयाकडे जाणार नाही. या वाहनांनी कल्पना हॉटेल, सणस पुतळ्यामार्गे जावे.

सणस पुतळा, कल्पना हॉटेलकडून येणाऱ्या वाहनांना ना सी फडके चौकात डावीकडे वळून शाहूपूल किंवा सिंहगड रस्ता या मार्गाने पुढे जावे लागेल.

गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून टिळक रस्ता, शास्त्री रस्ता या मार्गावरील रस्त्यावरील पार्किंग बंद ठेवण्यात येईल. 

नागरिकांना सभेसाठी येताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

अयोध्या सुनावणीःयूपीत हालचालींना वेग, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द