पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींनी फोनवरुन थेट नायडू रुग्णालयातील नर्सशी साधला संवाद, अन्...

पंतप्रधान नरेंद्र मोदी

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने देशातही हाहाकार माजवला आहे. दिवसागणिक देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार, केंद्रसरकार आणि प्रशासनाने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेत आहेत. जीवेघेण्या साथीच्या रोगावर कोणतीही लस नाही. त्यामुळे स्वत:साठी, तुमच्या कुटुंबियांसाठी आणि देशाचे जागृक नागरिक या नात्याने घरात राहून सरकार आणि प्रशासनाला कोरोनाचा सामना करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन मोदी वारंवार करत आहेत.

इराण: मिथेनॉलने कोरोना बरा होतो, या अफवेने घेतला ३०० जणांचा बळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील नायडू रुग्णालयात (डॉ. नायडू सांसर्गिक रोगांचे रुग्णालय) ऑन ड्युटी असलेल्या नर्सशी दूरध्वनीच्या माध्यमातून संवाद साधल्याचे समोर आले आहे. खुद्द पंतप्रधानांचा फोन आल्यामुळे नर्स निश्चितच भारावून गेल्या असतील. संवादादरम्यान मोदींनी सर्वप्रथम कामात व्यग्र असलेल्या छाया नावाच्या नर्सच्या आरोग्याबाबतही विचारपूस केली. संबंधित नर्सने आपल्यासह रुग्णांची योग्य ती काळजी घेत असल्याची माहिती मोदींना दिली. जवळपास पाच मिनिटे झालेल्या संवादामध्ये मोदींनी उपचारादरम्यान रुग्णाला कशापद्धतीने धीर देता, याची देखील विचारणा केली.

व्हेंटिलेटर्सच्या उत्पादन वाढीसाठी मारुती सुझुकी करणार मदत 

कोरोनाचा लढा देण्यासाठी कामावर येण्यासाठी घरातून बाहेर पडत असताना परिस्थितीमुळे चिंतेत असलेल्या कुटुंबियांची मनधरणी कशी करता? असा प्रश्नही मोदींनी नर्सला विचारला होता. यावर छाया म्हणाल्या की, सर  बाहेर पडत असताना कुटुंबियांना चिंता वाटणे स्वाभाविक आहे. पण देशातील सध्याची परिस्थिती पाहता माझे योगदान हे अत्यावश्य आहे याची माझ्या कुटुंबियांना जाणीव आहे. आम्हाला लोकांची मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावाच लागेल, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

कोरोना: बाजारात जाताय तर 'ही' सावधानता नक्की बाळगा!

देशात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली असून अत्यावश्यक सेवा देणारी मंडळी कोरोना विषाणूच्या लढ्यात जोखीम माहित असतानाही स्वत:ला झोकून देऊन वैद्यकिय सेवा देणारी मंडळी आपले कर्तव्य बजावत आहे. कठिण परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील तसेच त्यांच्या कामात सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुकही केले आहे. एवढेच नाही तर मोदींनी देशवासियांना देखील या मंडळीच्या कामाला दाद देण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या हाकेला भारतवासियांनी देखील साद घातली आणि अत्यावश्यक सेवेतील मंडळींना सलाम केल्याचे पाहायला मिळाले आहे. 
   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pm modi calls the Pune Naidu Hospital nurse and asks how does corona patients overcome fear