पिंपरी-चिंचवडमध्ये २३ जुलै रोजी अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली होती. या घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी एका आरोपीला अटक केली. सांगवी परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने २२ जुलै रोजी चिमुकलीचे तिच्या घराजवळून अपहरण केले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार करुन हत्या केली होती.
Pune: Pimpri-Chinchwad Police yesterday arrested one person in connection with the rape and murder of a 2.5-year-old girl in Sanghavi area. The victim was abducted from her house on July 22. The accused has been identified as a relative of the victim. #Maharashtra
— ANI (@ANI) July 25, 2019
पुण्यातल्या दांडेकरनगरमध्ये गोदामाला भीषण आग
पिंपरी -चिंचवडच्या पिंपळे सौदागर परिसरातील एका कामगार वसाहतीमध्ये चिमुकली राहत होती. सोमवारी सायंकाळी ती घरातून बेपत्ता झाली. तिच्या नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला. मात्र मुलगी सापडत नसल्यामुळे त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेची नोंद करत तपासाला सुरुवात असता मंगळवारी सकाळी चिमुकलीचा मृतदेह पिंपळे सौदागर परिसरातच आढळून आला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदानासाठी पाठवण्यात आला.
पुढचे तीन दिवस मुंबईत मुसळधार; कोकण, गोव्यात होणार अतिवृष्टी
दरम्यान, चिमुकलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. पोलिसांनी या घटनेचा तपासाची चक्र वळवली. तपासा दरम्यान पोलिसांनी सांगवी परिसरातून एका आरोपीला अटक केली. त्यानेच तिच्यावर बलात्कार करुन हत्या केली असल्याचे त्याने कबूल केले. हा आरोपी चिमुकलीचा नातेवाईक असल्याचे देखील पोलिस तपासात समोर आले आहे.