पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंपरी चिंचवड: बारावीत नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

बारावीत नापास झाल्यामुळे आयुष्य संपवले

बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्याच्या कारणावरुन १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आपले आयुष्य संपवले. मंगळवारी निकाल जाहीर झाल्यानंतर नैराश्यातून त्याने समर्थनगर येथील राहत्या घरी छताच्या हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला.ऋषीकेश पांचाळ असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून सांगवी येथील समर्थ नगर परिसरात तो आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता.

पुण्यातील डॉक्टराला 'जय श्री राम' नामाचा जप करण्यासाठी जबरदस्ती

त्याचे वडील टेलर तर आई पिरंगुट येथील शाळेत शिक्षका आहे. ऋषीकेशने  पिंपरी-चिंचवडमधील महाविद्यालयातून कला शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती.  सांगवी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी ऋषीकेश घरामध्ये एकटाच होता. एकूण सहा विषयांपैकी तो केवळ मराठी विषयात उत्तीर्ण झाला होता. 

पिंपरी-चिंचवडमध्ये लहान मुलावर दोन अल्पवयीन मुलांकडून लैंगिक अत्याचार

निकाल जाहीर झाल्यानंतर शेजारील मित्र मंडळी त्याच्याकडे गेली. त्यांनी दार ठोठावल्यानंतर आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. मित्रांनी खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर त्यांना ऋषिकेशने गळफास लावल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.