पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्या निकालापूर्वी धार्मिक पोस्ट शेअर करु नका : पोलीस आयुक्त

नोव्हेंबरच्या १८ तारखेपूर्वी अयोध्या प्रकरणाचा निकाल अपेक्षित आहे.

अयोध्या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाल्यानंतर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय कोणता निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. न्यायालयाच्या निकालापूर्वी कोणीही धार्मिक भावना भडकवणारी पोस्ट किंवा टिप्पणी करुन तेढ निर्माण करु नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केले आहे. 

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन विवाद प्रकरणातील खटल्याचा निकाल १८ नोव्हेंबरच्यापूर्वी लागणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर देशात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. १० हजारहून अधिक व्हॉट्सअप ग्रूप्सवर पोलिसांची नजर आहे.  

अयोध्या निकालादिवशी १८३ जणांना नजरकैदेत ठेवणार

या प्रकरणाशी निगडीत वादग्रस्त फोटो शेअर करण्यास बंदी घालण्यात आली असून जर एखाद्याने असे कृत्य केले तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर दररोज पोलिसांच्या ४० हून अधिक बैठका होत आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Pimpri Chinchwad Police Comissionerate advised religious posts or comments should not be shared before the ayodhya result