पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंपरी-चिंचवडमध्ये ४२ डॉक्टर्स आणि ५० कर्मचारी क्वारंटाइन

कोरोना विषाणू

पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयातील ४२ डॉक्टर्स आणि ५० कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर रुग्णालयाकडून खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ७८१ वर

पिंपरी-चिंचवड येथे ३१ मार्च रोजी रिक्षा चालकाचा अपघात झाला. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचार सुरु असताना रिक्षा चालकाला श्वसनाला त्रास होऊ लागला. कोरोनासारखी लक्षणं वाटल्यामुळे डॉक्टरांनी २ एप्रिलला त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले. 

अमेरिकेत कोरोनामुळे २४ तासांत १२०० जणांचा मृत्यू

शनिवारी रिक्षाचालकाचा कोरोना तपासणी अहवाल आला. या अहवालामध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रिक्षाचालकाला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ज्या खासगी रुग्णालयात या रिक्षाचालकावर उपचार झाले होते. त्या रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तसंच, रिक्षाचालकाच्या १० नातेवाईकांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

कनिकाचा दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह, रुग्णालयातून डिस्चार्ज