पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुक्ता टिळकांच्या प्रचारपत्रकात लोकमान्य टिळकांचे छायाचित्र नसल्याने आश्चर्य

मुक्ता टिळक

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. गेल्या आठवड्यात नवी दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयात मुक्ता टिळक यांची उमेदवारी जाहीर करताना त्या लोकमान्य टिळकांच्या वारसदार असल्याचे पक्षाकडून विशेष उल्लेख करून सांगण्यात आले. पण खुद्द मुक्ता टिळक यांच्या प्रचारपत्रकात लोकमान्य टिळकांचे छायाचित्र नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मतदारसंघातील राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.

पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढू, उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा

गेल्या गुरुवारी, ३ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुक्ता टिळक यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या एका पत्रकावर लोकमान्य टिळकांचे छायाचित्र वापरण्यात आलेले नाही. या पत्रकावर माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुण्याचे खासदार गिरीष बापट आणि महायुतीतील अन्य महत्त्वाच्या नेत्यांची छायाचित्रे आहेत. पण लोकमान्य टिळकांचे छायाचित्र या पत्रकात वापरण्यात आलेले नाही. या पत्रकामध्ये 'वारशाला जोड कर्तृत्त्वाची' अशी ओळ आहे. पण ज्यांचा वारसा आहे त्यांचे छायाचित्र मात्र पत्रकातून गायब आहे, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. कसबा विधानसभेतील भाजपचे अध्यक्ष राजेश येनपुरे यांनी हे पत्रक प्रकाशित केले आहे. ५ ऑक्टोबर रोजी हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आल्याचे त्यावर म्हटले आहे.

महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची पहिली यादी जाहीर करताना पाच जणांच्या नावाचा विशेष उल्लेख केला होता. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि लोकमान्य टिळकांच्या वारसदार म्हणून मुक्ता टिळक यांचा उल्लेख करण्यात आला होता. उर्वरित उमेदवारांची नावे केवळ यादीमधूनच जाहीर करण्यात आली होती.

घरावर संकट आले म्हणून पळायचे नसते: बाळासाहेब थोरात

दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ वर्षे झाल्यानिमित्त पुणे महापालिकेने एक लोगो तयार केला होता. या लोगोवरही लोकमान्य टिळकांचे छायाचित्र नसल्यामुळे त्यावेळी वाद निर्माण झाला होता.

प्रत्येकवेळी छायाचित्राची गरज नाही - मुक्ता टिळक
प्रचारपत्रकामध्ये खाली लिहिले आहे की 'वारसाला जोड कर्तृत्त्वाची'. वारसा कुठेही जात नसतो. हेच नमूद करण्यासाठी ते लिहिले आहे. प्रत्येकवेळी छायाचित्र वापरलेच पाहिजे असे काही नाही. काहीवेळा आपण शब्दांमध्येदेखील भावना व्यक्त करू शकतो, अशी प्रतिक्रिया मुक्ता टिळक यांनी दिली आहे.

लोकमान्य टिळकांचे छायाचित्र नसलेले प्रचारपत्रक