पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात पेट्रोल-डिझेल विक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यामध्ये सर्वसामान्यांसाठी पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदी लागू केली आहे. तरी सुद्धा पुण्यातील लोकं गाड्या घेऊन मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी परिपत्रक जारी करत पेट्रोल-डिझेलवर बंदी घातली आहे.

कोरोनाच्या संकटाला आधीच गांभीर्याने घ्यायला हवे होते: राहुल गांधी

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकामध्ये असे म्हटले आहे की, पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना पेट्रोल भरण्यास मनाई करण्यात येत आहे. मात्र अत्यावश्यक सेवेवर कार्यरत असणारे कर्मचारी, कोरोना नियंत्रणासाठी कार्य करणारी व्यक्ती, अत्यावश्यक वस्तू आणि सेवेसाठी काम करणारी व्यक्ती आणि वैद्यकिय उपचाराची गरज असणारी व्यक्ती यांना यामध्ये सूट देण्यात आली आहे. तसंच, त्यांना सूट देतांना एकदाच टाकी पूर्ण भरुन घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

हँडवॉशने हात धुवा, मगच किराणा माल मिळेल; सोलापुरात उपक्रम

दरम्यान, कोरोना विषाणूचा वेगाने प्रसार होत चालला आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरी सुद्धा नागरिकांमध्ये याचे गांभीर्य पहायला मिळत नाही. रविवारी पुणेकरांनी जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, सोमवारी मोठ्यासंख्येने कामावर जाण्यासाठी आणि भाज्या खरेदी करण्यासाठी बाहेर पडले. पुण्यामध्ये अनेक पेट्रोल पंपावर मास्क लावले असेल तरच पेट्रोल मिळेल असे फलक लावले आहेत. तरी सुद्धा अनेक जण मास्क न लावताच पेट्रोल भरण्यासाठी येत आहे.