पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणेः पेस्ट कंट्रोलनंतर खबरदारी घेतली नाही, गुदमरुन दाम्प्त्याचा मृत्यू

(प्रतिकात्मक छायाचित्र)

घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य ती खबरदारी न घेतल्याने गुदमरुन दाम्प्त्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली. अपर्णा मजली (५४) आणि अविनाश मजली (६४) असे मृत दाम्प्त्याचे नाव आहे. ते गणेशविहार सोसायटीत राहत होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

बिबवेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश मजली यांनी दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी घरात पेस्ट कंट्रोल केले होते. त्या दिवशी ते आपल्या नातेवाईकाकडे गेले होते. सायंकाळी पुन्हा त्या आपल्या घरी परतले. 

काश्मीरमध्ये पंचायत निवडणूक जाहीर, ३७० हटविल्यानंतर पहिली निवडणूक

घरातील खिडक्या, दरवाजे बंद असल्यामुळे हवा दुषित होती. परंतु, पेस्ट कंट्रोल करणाऱ्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी घराचे दरवाजे, खिडक्या न उघडता, घरातील पंखा चालू न करता घरात टीव्ही पाहत बसले. विषारी वायूमुळे अविनाश मजली यांना श्वास घेणे कठीण जात होते. त्यातच ते खाली पडले. तोच त्रास त्यांच्या पत्नी अपर्णा यांना होऊ लागला. 

त्यांची मुलगी श्रावणी मजली सायंकाळी सात वाजता घरी आली. तिने या दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी दोघेही बेशुद्धावस्थेत होते. मात्र उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लखनऊच्या कोर्टात बॉम्ब हल्ला, दोन वकील जखमी

आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे मजली दाम्प्त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस अधिकार आर एस उसगावकर यांनी सांगितले.