पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस आयुक्त ट्रेंडिंगमध्ये, कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

आर. के. पद्मनाभन

चोखपणे आपले काम केले नाही म्हणून पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी गेल्या एक वर्षात खात्यातील १२ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. यापैकी काही जणांना थेट सेवेतून निलंबित करण्यात आले आहे तर काही जणांची इतरत्र बदली करण्यात आली आहे. खात्यातील बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यामुळे पद्मनाभन पिंपरी-चिंचवडमध्ये ट्रेडिंगमध्ये आले आहेत.

वाहतुकीचे नियम पाळा, १०० रुपयांचे व्हाऊचर मिळवा!

पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि सामान्यांचे जनजीवन सुसह्य करण्यासाठी पद्मनाभन यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक उपाय योजले आहेत. त्यांच्या 'मुक्तद्वार' धोरणाचे सर्वस्तरांतून कौतुक केले जात आहे. यामध्ये कोणताही तक्रारदार थेट त्याची तक्रार घेऊन पोलिस आयुक्तांकडे येऊ शकतो. 
पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याबद्दल पद्मनाभन म्हणाले, आपले काम चोखपणे बजावत नसल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी लोकांना व्यवस्थित वागणूक दिली नाही. त्यामुळेच चौकशीनंतर त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. 

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुण्यात १३ प्रमुख ठिकाणी मोठे बदल

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून होत असलेल्या बदलांना शहरातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी पद्मनाभन यांच्या कामाचे कौतुक केले. लोकांचा पोलिसांवरील उडालेला विश्वास पुन्हा मिळवण्यास पद्मनाभन यांच्यामुळे मदत झाली असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. या संदर्भात मारुती भापकर म्हणाले, खात्यातील बेशिस्त आणि कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा जो धडाका पद्मनाभन यांनी लावला आहे, त्यामुळे लोकांचा पोलिसांवरील विश्वास वाढण्यास मदतच झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण ही पोलिसांचीच जबाबदारी आहे.