पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस

अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची तारांबळ

कोरोना विषाणूचे संक्रमण वाढू नये म्हणून गेल्या रविवारपासून घरातच असलेल्या पुणेकरांना आज अचानक पावसाने दर्शन दिले. पुण्याच्या दक्षिण भागात अनेक ठिकाणी संध्याकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. सिंहगड रोड, कात्रज, आंबेगाव या भागात पाऊस पडल्याची माहिती मिळाली आहे. 

कोरोनाच्या १५ रुग्णांची प्रकृती सुधारली, लवकर डिस्चार्ज : आरोग्यमंत्री

राज्यात संचारबंदी असल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कमी आहे. पण जे अत्यावश्यक सेवेत काम करतात. त्यांची अचानक आलेल्या पावसामुळे धांदल उडाली. पुण्यात गेले काही दिवस दुपारच्या वेळी कडक ऊन आहे. रात्रीही उकाडा जाणवतो. फक्त पहाटेच्या वेळी हवेत गारवा असतो.

पुणे, मुंबईतील नागरिकांकडे संशयाने पाहू नका: आरोग्यमंत्री

वेधशाळेने पुणे आणि परिसरात त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी येते चार ते पाच दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याप्रमाणेच मंगळवारी संध्याकाळी पाऊस झाला.