पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बालेवाडी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केवळ एकच वृक्ष तोडले'

मध्यभागी असलेल्या झाडांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार नसल्याची ग्वाही

बालेवाडी येथील दसरा चौक ते लक्ष्मीमाता मंदिर रस्ता प्रकल्पासाठी वृक्ष तोडीच्या वृत्तामुळे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) च्या अधिकाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागले. मात्र या प्रकल्पासाठी केवळ एकच वृक्ष तोडण्यात आल्याचे कत्रांटदाराने स्पष्ट केले आहे.  

गौतम नवलखा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

याप्रकरणी बाणेर बालेवाडीतील बीबीपीआरए संघटना आणि जैवविविधता संवर्धन आणि वसुंधरा अभियान यांनी बालेवाडी नगरसेवक अमोल बालवडकर यांची भेट घेतली. दसरा चौक ते लक्ष्मी माता मंदिर वृक्ष तोडण्याबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी ठेकेदार पाटील कन्स्ट्रक्शनचे सदस्य आणि स्मार्ट सिटी सल्लागारही उपस्थित होते.

डी एस कुलकर्णींच्या चार नातेवाईकांचा पोलिसांकडून शोध सुरू

याससंदर्भात बालवडकर म्हणाले की, स्मार्ट सिटी प्रकल्प योजने अंतर्गत रस्त्याच्या मध्यभागी असलेले एकच झाड तोडण्यात आले. मध्यभागी असलेल्या झाडांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार नसल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. रस्त्याच्या मध्यभाग असलेली १२ झाडे पुनर्स्थित केली गेल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पसाठी एलिट एम्पायर सोसायटीच्या भिंतीजवळची झाडे तोडली जातील यासंदर्भात लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रस्त्याकडेच्या किंवा सोसायटीच्या परिसरातील झाडांना कुऱ्हाड चालवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाल आहे.