पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात कोरोनाचा नवा रुग्ण, राज्यात बाधितांची संख्या ४२ वर

कोरोना

पुण्यात कोरोना विषाणूची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळला आहे.  पुण्यातील कोरोना विषाणू  बाधितांची संख्या बुधवारी सकाळपर्यंत १८ वर पोहचली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली आहे. संबधीत रुग्ण हा फ्रान्स आणि नेदरलँडमधून प्रवास करुन आला होता. देशात महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही सर्वाधिक आहे. 

येस बँकेचे व्यवहार सायंकाळी ६ वाजेपासून पूर्ववत

दोन दिवसांपासून परदेशातून पुण्यात येणाऱ्यांचे २४ तास अलगीकरण करण्यात येत आहे. सध्याच्या घडीला अलगीकरण कक्षांची क्षमता ५२० इतकी असूनत बालेवाडी परिसरात आणखी एक अलगीकरण कक्ष उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली. कोरोनाचा वेगाने होणारा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने १५० पथके स्थापन केली असून सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये १०० तर पुण्यासाठी ५० अशी विभागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतीय सैन्यातील जवानाला कोरोनाची लागण

विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी एकत्र जमण्यावर अधिकाधिक बंधने आणण्यात येत आहेत. व्यापाऱ्यांपाठोपाठ शहरातील हॉटेल, बार-रेस्टॉरंटही तीन दिवस बंद करण्याचा निर्णय हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने मंगळवारी घेतला. पुण्यातील जवळपास ८५० हॉटेल्स बंद राहणार आहेत. नागरिकांची वर्दळ रोखण्यासाठी शहरातील पीएमपी आणि एसटी बसची संख्याही आजपासून कमी करण्यात येणार आहे; तसेच प्रगती एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

सोलापुरातील विद्यार्थ्यांकडून 'गो कोरोना'चा हटके संदेश

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:One more positive for Coronavirus in Pune Total number of positive cases reaches 18 in Pune