पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागपूरमध्ये २ तर पुण्यात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला

नागपूरमध्ये आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले  (HT)

नागपूरमध्ये आणखी दोघांना करोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर पुण्यातही एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे नागपूरमधील कोरोना रुग्णांची संख्या ३ वर तर पुण्यातील रुग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी पत्रकार परिषदेत कोरोना रुग्णांची माहिती दिली. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे. 

नागपुरात कोरोनाची लागण झालेले दोघे पती-पत्नी असून ते परदेशातून आलेले असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, पुण्यात ३११ रुग्ण निरीक्षणाखाली असल्याची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. २४ जण रुग्णालयात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद

उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी १ किंवा २ रुग्ण माध्यमांना देत आहेत. त्यांची मानसिकता आपण समजू शकतो. गेल्या १० ते १२ दिवस ते एकटे राहत असल्यामुळे ते त्रस्त होतात. त्यातून ते थेट माध्यमांशी संपर्क साधून माहिती देत आहेत. ते देत असलेली माहिती चुकीची आहे. चुकीची माहिती जाऊ नये, त्यामुळे माध्यमांनीही प्रशासनाकडून त्याची सत्यता पडताळून पाहावी. हे रुग्ण हेतूपुरस्सर करत नाहीत, असेही म्हैसेकर यांनीही सांगितले. 

मुंबई, पुण्यातील जीम, स्विमिंग पूल, थिएटर बंद करण्याचा निर्णय

त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवू नका. अशांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. साताऱ्यात खोटी माहिती सोशल मीडियावर टाकणाऱ्याचा शोध घेतला जात असल्याचेही ते म्हणाले.