पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ससूनमध्ये उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुण्यातील ससून रुग्णालयात ५० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. न्यूमोनिया असल्यामुळे संबंधित महिलेला बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना विषाणूची तपासणीसाठी या महिला रुग्णाचे नमुने घेण्यात आले होते. हे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. रात्री ८ वाजता महिलेने ससून रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिलेचा परदेशी प्रवास किंवा परदेशातून परतलेल्या कोणाशी संपर्कात आलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी संसर्गातून तिला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.  

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ४१६ वर; ८१ नव्या रुग्णात वाढ

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'राज्यात कोरोनाचे ८१ नवे रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक ५७ रुग्ण हे मुंबईतील आहेत. तर पुण्यामध्ये ६, पिंपरी-चिंचवडमध्ये ३, अहमदनगरमध्ये ९, ठाण्यामध्ये ५ आणि बुलढाण्यामध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४१६ वर पोहचला आहे.  

'राज्यातील तब्बल १४०० लोक मरकजमधील कार्यक्रमात सहभागी झाले होते'

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता पाचशेच्या घराकडे वाटचाल करताना दिसत आहे. नवी दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील हजारहून अधिक लोक सहभागी झाल्याची माहिती यापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यातील काहींचा शोध बाकी असून अनेकाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून या रिपोर्टस् नंतर राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आणखी वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.