पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिका रिटर्न पुणेकराला कोरोनाची लागण, पुण्यात नववा रुग्ण

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात येत आहे. (संग्रहित छायाचित्र)

अमेरिकेहून पुण्याला आलेल्या आणखी एका पुणेकराला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णासह आता पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ९ वर पोहचला असून राज्यातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा १२ वर पोहचला आहे. रुग्णावर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुबईहून परतलेल्या पुण्यातील दाम्पत्याच्या रुपात राज्यात पहिला रुग्ण हा पुण्यात आढळला होता. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली. 

मंत्री विदेशात जाणार नाहीत, तुम्हीही जाऊ नका, मोदींचा सल्ला

यापूर्वी पुण्यात ८, मुंबईत २ तर नागपूरमधील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. नागपूरमध्ये सापडलेला रुग्णही अमेरिकेहून परतला आहे. त्याव्यतिरिक्त जे रुग्ण आढळले होते ते सर्व पुण्यातील कुटुंबियांच्या सानिध्यातील होते. नवीन केसही या पेक्षा वेगळी असून आता या रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याच आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. संबंधित रुग्ण हा १ मार्चला अमेरिकेहून पुण्याला परतल्याची माहिती मिळत आहे. 

कोरोना विषाणूः दिल्लीतील सर्व चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यात नव्याने सापडलेल्या रुग्णामुळे चिंता आणखी वाढली आहे. हा रुग्ण देखील परदेशातून परतल्यानंतर अनेकांच्या सहवासात आल्यामुळे आणखी काहींपर्यंत कोरोनाचे संक्रमण झाले आहे का? याची तपासणी करण्यासाठी प्रशासनाला पुन्हा शोधमोहिम करावी लागणार आहे. दुबईतून परतलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या सहवासातील अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. तसाच प्रकार या नव्या केसमध्ये झाल्यास आकडा आणखी वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:One More corona positive cases in Pune Coronavirus total number of positive cases in Maharastra rises to 12