पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दापोडी:३० फूट खोल खड्ड्यात पडून जवानासह दोघांचा मृत्यू

मदतकार्य सुरु असताना

ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू असताना सुमारे २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या कामगारांना वाचविण्याच्या प्रयत्नात पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाच्या जवानासह दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दापोडी येथे घडली. मृत्युमुखी पडलेल्या जवानाचे नाव विशाल जाधव तर मृत कामगाराचे नाव नागेश जमादार आहे. दापोडी येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. 

दापोडी येथील विनियार्ड चर्चजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ काही दिवसांपासून 'अमृत' योजनेंतर्गत ड्रेनज लाइनचे काम सुरू आहे. यासाठी सुमारे ३० फुटांचा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात काम करताना जमादार व त्याचा एक सहकारी माती अंगावर पडल्याने गाडले गेले होते. या दोघांना बाहेर काढण्यासाठी दोन स्थानिक खड्ड्यात उतरले. मात्र, तेही भुसभुशीत मातीमुळे खड्ड्यात पडले. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशामक दलाकडून मदतकार्य सुरु केले. दोन युवकांना बाहेर काढण्यात आले. तेव्हा बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. बघ्यांच्या गर्दीने खड्ड्यातून बाहेर काढलेल्या मातीचा ढिगारा जवान अंगावर कोसळला. यात तीन जवानांसह जमादार मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

केंद्राकडून मदत मिळावी म्हणून पंतप्रधांनाची भेट घेणारः मुख्यमंत्री

दोन जवानांना बाहेर काढण्यात. पण जवान जाधव यांचा यात मृत्यू झाला. तर जमादार याचा मृतदेह ढिगाऱ्याखाली आढळून आला. 'एनडीआरएफ' व 'सीएमई'च्या जवानांकडून रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:one fire brigade jawan and one civilian dead due to fallen dug for a drainage line in dapodi pune