पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात २ नोव्हेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

पुण्यात २ नोव्हेंबरपर्यंत पाऊसच

पुण्यात ३१ ऑक्टोबरपासून ते २ नोव्हेंबरपर्यंत ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. 

पुणे शहरात तीन दिवस पाऊस पडेल, पुणे शहर तसेच आजुबाजूच्या अनेक भागात  वादळीवाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळतील. मात्र २ नोव्हेंबरनंतर पाऊस पूर्णपणे थांबेल अशी माहिती हवामान खात्याचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. 

पुणे जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; शेतीसह घरांचे मोठं नुकसान

ग्लोबल वॉर्मिंग, उशीरानं झालेलं मान्सूनचं आगमन आणि इतर गोष्टींचा परिणाम म्हणून नोव्हेंबर महिन्यातही पावसाच्या सरी कोसळतील असंही ते म्हणाले. 

पुण्यातील जनता सहकारी बँक, जळगाव पिपल्सवर आरबीआयची कारवाई