पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणेकरांनो पाणी जपून वापरा, ६ फेब्रुवारीला पाणी नाही

६ फेब्रुवारीला पुण्यात पाणी नाही

संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी ६ फेब्रुवारीरोजी बंद राहणार आहे. पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी आणि होळकर पंपिंग स्टेशन येथे विद्युत आणि पंपिंग दुरुस्तीची  कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहिल तर शुक्रवारी सकाळी उशिरा पाणीपुरवठा पूर्ववत होईल. मात्र शहराला कमी दाबानं पाणीपुरवठा होईल अशी माहिती पुणे महानगर पालिकेनं दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना असुविधेचा सामना करावा लागणार आहे. पुणेकरांनी यासाठी संपूर्ण सहकार्य करावं असं आवाहन पालिकेनं केलं आहे. 

पेन्शनरांसाठी मोठा निर्णय, घरातूनच देता येणार हयातीचा दाखला

कुठे पाणी बंद राहणार 
शहरातील सर्व पेठा, पर्वती गाव, सहकारनगर, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी रस्ता परिसर, स्वारगेट, पर्वती, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, शिवाजी रस्ता परिसर, स्वारगेट, पर्वती, मुकुंदनगर, पर्वती गाव,  सातारा रस्ता, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर आणि नगर रस्ता या ठिकाणी पाणी येणार नाही. 

यवतमाळ निवडणूक: महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी

तसेच एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध-बावधन, सूस, सुतारवाडी, भूगांव रस्ता,  हडपसर, महमंदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर आणि अन्य भागातही पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. 

देशपातळीवर NRC संदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही - केंद्र सरकार