पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नो पार्किंग झोन हटवण्याच्या मागणीसाठी डॉक्टर, व्यावसायिक रस्त्यावर

नो पार्किंग झोन हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन

पुण्यातील वेगवेगळ्या भागात वाहतूक कोंडीची मोठी समस्या पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर बाणेर रोडवर शुक्रवारी नगरसेवक, डॉक्टर आणि व्यावसायिकांनी नो ट्रॅफिक झोन हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. यशवंतराव चव्हाण प्रशासकीय अकादमी ते सदानंद हॉटेल या पाच किलोमीटरच्या परिसरातील नो पार्किंग झोनचा आदेश मागे घेण्यासाठी ही मंडळी रस्त्यावर उतरली होती.

हा बारामतीकर तुम्हाला पुरुन उरेल!- शरद पवार

पुणे शहर विकास समितीचे अध्यक्ष अमोल बलवाडकर, नगरसेवक आणि भाजपा युवा मोर्चाचे मुख्य सचिव यांनी वाहतूक पोलिस विभागाला यासंदर्भात पत्र पाठवे होते. तसेच या परिसरातील व्यावसायिकांना निषेध मोर्चात सहभागी होण्याबाबत आवाहन केले होते. बाणेरमधील रिटेल ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश तापकीर म्हणाले, नो पार्किंग झोनच्या निर्णयामुळे सणांच्या हंगामात ग्राहकांची गैरसोय होत आहे. परिणामी त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होत असून आम्हाला तोटा सहन करावा लागते आहे.

PKL 7 : बंगाल वॉरियर्सने फायनल युद्ध जिंकले!

पुणे जिल्हा रिटेल ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन निवंगून म्हणाले की, पार्किंग झोनच्या निर्णयाबाबत दुकानदारांना कोणत्याही प्रकारची सूचना किंवा नोटीस पाठवण्यात आली नव्हती. यासंदर्भात प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.